Independence Day 2024 | 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. त्याआधी जवळपास दीडशे वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले होते. परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी त्यांच्या प्राणाची अहोती दिलेली आहे. आणि त्यामुळेच हा सुवर्ण दिवस संपूर्ण भारताला बघायला मिळालेला आहे. स्वातंत्र्यानंतर अखंड भारताऐवजी भारत आणि पाकिस्तान असे दोन देश उदयास आले. परंतु आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन हा 14 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. जर या दोन देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले आहे, तर हे दोन देश स्वातंत्र्य दिन दोन वेगवेगळ्या दिवशी का साजरे करतात? याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
भारत आणि पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र होऊन आता 78 वर्षे पूर्ण झालेले आहे. परंतु 14 ऑगस्ट 1947 रोजी सगळ्यात आधी पाकिस्तान या देशाला स्वातंत्र मिळाले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाले. दोन्ही देशांना स्वातंत्र मिळाले होते, तरीही पाकिस्तानने भारताच्या एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी मुस्लिम बहुल राष्ट्र म्हणून आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. तर भारताने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा केला.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचे कारण | Independence Day 2024
भारत आणि पाकिस्तान हे वेगळ्या होण्यामागे आणि वेगवेगळ्या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरी करण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामागे अनेक तर्क देखील लावले गेलेले आहे. परंतु इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की, 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती. त्यामुळे यामुळे त्यांनी त्याच दिवशी त्यांच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. परंतु असे देखील म्हटले जाते की, त्यावेळी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटन बॅटन हे ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी होते. त्यांनी 14 ऑगस्टला पाकिस्तानकडे आणि 15 ऑगस्टला भारताकडे त्यांची सत्ता हस्तांतरित केली. आणि याच कारणामुळे पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधी स्वातंत्र्य दिन साजरा करतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रश्नांबाबत असे देखील म्हटले जाते की, या दोन्ही देशांची प्रमाण वेळ ही वेगवेगळी होती. पाकिस्तानची प्रमाण वेळ ही भारतापेक्षा 30 मिनिटे मागे होती. जेव्हा भारतात 12 वाजलेले होते तेव्हा पाकिस्तानमध्ये 11:30 वाजलेले होते. आणि याच वेळी ब्रिटिश सरकारने भारतीय स्वातंत्र्य कायद्यावर सही केली. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. म्हणूनच भारत हा 15 ऑगस्ट रोजी आणि पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी त्यांचे स्वातंत्र्य दिन साजरे करतात. भारत आणि पाकिस्तान हे अगदी एक दिवसाच्या अंतराने स्वातंत्र्य दिन का साजरे करतात? याबद्दल अनेक इतिहासकारांनी जाणकार लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लावलेले आहेत.