टीम, HELLO महाराष्ट्र | आॅगस्ट महिणा म्हणलं तर भारत आणि पाकिस्तान दोघांसाठीही आझादीचा महिणा. यापार्श्वभुमीवर पाकिस्तान मधील एका युट्यूब चॅनेल ने अजब प्रैंक शुट केला आहे. त्यामधे “क्या आप इंडिया का झंडा फाडोंगे ?” असा प्रश्न विचारण्यात आला आहे. मात्र पाकिस्तान मधील नागरिकांची या प्रश्नावर दिलेल्या प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सदर व्हिडिओ “lahorified” या लाहोरस्थित युट्यूब चॅनेल ने शुट केला असून यामधे एक युवक पाकिस्तानातील गल्लीबोळांमधे फिरुन लोकांना “क्या आप इंडिया का झंडा फाडोंगे ?” असे विचारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाकिस्तानातील सामान्य माणसं भारताविषयी काय विचार करतात याचा अंदाज आपणाला येतो. सदर व्हिडिओ मधे पाकिस्तानी नागरीक भारताचा झेंडा फाडण्यास नकार देताना दिसत आहेत. पुढचा व्यक्ती त्यावर “मै आपको ५००० रु दुंगा, १० हजार दुँगा” असे म्हणतो आहे. मात्र तरीही पाकिस्तानातील लोक झेंडा फाडण्यास नकार देताना दिसत आहेत. “पचास हजार दोगे तब भी नही फाडुंगा” असेही एक पाकिस्तानी नागरीक म्हणताना दिसत आहे. “ये गलत बात है। इनसे कुछ है ही नही हमारा तो हम क्यो फाडे ये झंडा? आप १० लाख दोगे तोभी नही फाडुंगा ये झंडा” असेही एक नागरीक म्हणाला आहे. व्हिडिओ च्या शेवटी व्हिडीओ बनवणार्यांनी ‘स्वत: च्या धर्माचे पालन करत असताना ज्याप्रमाणे इतरांच्या धर्माचा मान राखणे महत्वाचे असते अशी शिकवणूक मुस्लिम समाजात देण्यात येते त्याचप्रमाणे आपल्या देशावर प्रेम करत असताना इतर देशांचा मान राखणे गरजेचे असते’ असा संदेश दिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येते की ज्याप्रमाणे आपल्याला वाटते तितके पाकिस्तानातील नागरीक भारताचा द्वेश करत नाहीत.
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वाद सर्वांनाच परिचीत आहे. पुर्वी एकच आसणारे हे दोन देश ब्रिटशांची राजवट संपल्यानंतर वेगळे झाले होते. १४ आॅगस्ट दिवशी पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो तर १५ आॅगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन असतो. यानिमित्ताने दोन देशांमधे मैत्रीचा पूल बांधूब एकमेकांबद्दलचा द्वेश कमी करण्याचा प्रयत्न करणारा, गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करणारा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=N0odqgRBRpo&w=560&h=315]