अभयचीवाडी सोसायटीत सत्तांतर : अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गटाचा विजय तर राष्ट्रवादीचा पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | अभयचीवाडी (ता. कराड) कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने सत्तांतर घडवले. ॲड. उदयसिंह पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने 12/1 असा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर यांना मानणाऱ्या पॅनेलचा पराभव करत सत्तांतर घडवून आणले.

शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलमधून यशवंत खाशाबा काटकर (140), सचिन नाथाजी जाधव (143), अनिल विठ्ठल पगडे (139), मच्छिंद्रनाथ दिनकर महाडिक (144), पंढरीनाथ संपत माने(145), विजय भीमराव येडगे (141), विठ्ठल दत्तू सुर्वे (142), महिला राखीव गटातून- लताबाई शामराव जाधव (148), सुमन तानाजी सुर्वे (140), इतर मागास वर्ग राखीव गटातून- शंकर ज्ञानु जाधव (150) निवडून आले. तर दशरथ राजाराम येडगे व रामचंद्र गणू वायदंडे हे दोघेजण बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे धनंजय विठ्ठल सुर्वे यांनी 132 मते मिळवून एकमेव विजय मिळाला. तर शेतकरी विकास पॅनेलचे हणमंत अनंता सुर्वे (131) यांचा केवळ 1 मताने पराभव झाला.

शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे संपत खाशाबा सुर्वे, अशोक बबन माने, अंकुश शामराव काटकर, तानाजी सुर्वे -फौजी, भगतसिंग महाडीक, तानाजी कोंडीबा सुर्वे, तात्याबा सुर्वे, रमेश सुर्वे यांनी नेतृत्व केले. विजयी उमेदवारांचे ॲड. उदयसिंह पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, माजी बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment