India Airports Reopen : देशातील 32 विमानतळे पुन्हा सुरु; पहा संपूर्ण डिटेल्स

India Airports Reopen
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑपरेशन सिंदूरमुळे बंद असलेली भारतातील ३२ विमानतळे पुन्हा एकदा सुरू (India Airports Reopen) करण्यात आली आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून उत्तर भारतातील जवळपास 32 विमानतळं बंद करण्यात आली होती. परंतु आता भारत- पाकिस्तान मधील संघर्ष निवाळल्यानंतर हि विमानतळे पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने याबाबत सूचना जारी करत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरं तर भारत आणि पाकिस्तान मधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १५ मे २०२५ पर्यंत देशातील ३२ विमानतळे नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी तात्पुरती बंद ठेवण्याची सूचना जारी करण्यात आली होती. मात्र आता तात्काळ प्रभावाने नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी हि सर्व विमानतळे उपलब्ध आहेत (India Airports Reopen) असे कळविण्यात येत आहे . प्रवाशांनी एअरलाइन्सशी थेट विमानाची स्थिती तपासावी आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइनच्या वेबसाइटचे निरीक्षण करावे,” असे विमान वाहतूक संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. त्यामुळं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. लेह, श्रीनगर यांसारख्या भागांमध्ये अडकलेल्या देशाच्या विविध राज्यातील प्रवाशांच्या परतीचा मार्गही आता मोकळा झालाय.

कोणकोणत्या विमानतळांचा समावेश? India Airports Reopen

या ३२ विमानतळांच्या यादीमध्ये जैसलमेर, जामनगर, जोधपूर, अधमपूर, अंबाला, अवंतीपूर, भटिंडा, भुज, बिकानेर, हलवारा, हिंडन, जम्मू, कांडला, कांगडा (गग्गल), केशोड, किशनगड, कुल्लू मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सारसावा, शिमला, थोईस आणि उत्तरलाई या विमानतळांचा समावेश आहे. बजेट कॅरियर्स इंडिगो आणि स्पाइसजेटसह अनेक प्रमुख विमान कंपन्यांनी या विमानतळांवर त्यांच्या सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.