ICC भारताकडून एकदिवसीय वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ICC एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. मात्र ICC आता भारताकडून वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेऊ शकते. आयीसीसीने बीसीसीआयला एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनासाठी भारत सरकारकडून करात सूट मिळण्याबाबत चर्चा करण्यास सांगितलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार यजमान देशाने स्पर्धेच्या आय़ोजनासाठी सरकारकडून करात सूट मिळवून द्यावी. या नियमानुसार भारतात काहीच हालचाली झालेल्या नसल्यामुळे ICC भारताकडून यजमानपद काढून घेऊ शकते.

भारत सरकारने भारतात आय़सीसी टी20 वर्ल्ड कप 2016 च्या आयोजनावेळी आयसीसीला करात कोणतीच सूट दिली नव्हती. आता आगामी वर्ल्ड कपसाठी भारताकडून असे कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. बीसीसीआयने आयसीसीला याबाबतीत काही होऊ शकणार नाही अशी माहिती दिली असल्याचे समजते. त्यामुळे आयसीसीला वाटले तर ते स्पर्धा भारतातून बाहेर खेळवू शकतात असंही बीसीसीआयकडून सांगण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी करात सूट देण्यास भारत सरकार पुन्हा नकार देऊ शकते. त्यामुळे आयसीसी आणि बीसीसीआय पुन्हा अडचणीत येऊ शकतात. आयसीसी वर्ल्ड कप आधी हा प्रश्न न सुटल्यास आणि BCCI च्या महसूलातून वसूल केल्यास दोघांमध्ये कायदेशीर लढाऊ निश्चित आहे. त्यामुळे कदाचित ICC भारताकडून एकदिवसीय वर्ल्ड कप 2023चे यजमानपद काढून घेऊ शकते.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या