भारत-चीन तणाव: पंतप्रधान मोदी घेणार आज सर्वपक्षिय बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. तप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली होती. भारतातील विविध पक्षाचे प्रमुख या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाग घेतील.

बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व प्रमुख पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला एकूण १७ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. तसंच भारताच्या जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहितीही समोर आली आहे. अशा वेळी भारत आणि चीन सीमेवर तणाव अजूनही कायम आहे.

हे नेते लावणार सर्वपक्षिय बैठकीला हजेरी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान, सिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, टीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, बीजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन, तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, बसपा प्रमुख मायावती समाजवादी पार्टीच नेत अखिलेश यादव, छत्तीसगढचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment