देशात मागील २४ तासात ४४५ कोरोना बळींची नोंद; कोरोनाबाधितांची संख्या सव्वा ४ लाखांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या सव्वा ४ लाखांवर पोहचली आहे. देशात गेल्या 11 दिवसांपासून दररोज 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 14,821 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 445 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 26 हजार 910 वर पोहोचला आहे. सतत वाढणारी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे.

देशात आतापर्यंत 2,37,196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या देशातील 1,74,387 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात 13,699 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांचा रिकव्हरी रेट सुधारला आहे. कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील रिकव्हरी रेट वाढून 55.77 टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 132075 इतका झाला आहे. 65744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. तर आतापर्यंत 6170 जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment