देशातील कोरोनाबळींची संख्या १ लाखांच्या टप्प्यावर; मागील २४ तासात ८६ हजार ५०८ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना महामारीचा उद्रेक कायम असून कोरोनाबळींची संख्या १ लाखच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. देशात कोरोना मृतांची संख्या ९१ हजारापेक्षा जास्त झाली. दिवसेंदिवस कोरोना मृतांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरचं कोरोना बळींचा आकडा १ लाख होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांत १,१२९ जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ५०८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली आहे. याचवेळी, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.२५ टक्के इतके आहे.

देशात ९ लाख ६६ हजार ३८२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ४६ लाख ७४ हजार ९८८ इतकी झाली आहे. दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ६ कोटी ७४ लाख ३६ हजार ३१ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर बुधवारी ११ लाख ५६ हजार ५६९ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

Leave a Comment