हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली ‘हि’ महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यातील निलगीरीच्या डोंगरात काल लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 13 जणांचा मृत्यू झाला. यानंतर आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी लोकसभेत घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर वेलिंग्टनच्या मिलटरी रुग्णालयात वरुण सिंग जीवनरक्षक प्रणालीवर आहेत. या दुर्घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून घेण्यात आली असून त्यानंतर आता या घटनेचा अधिक तपास केला जात असून ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्याच्या पडताळणीनंतर लवकरच अधिक माहिती मिळेल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथे जंगलात लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती आज संरक्षणमंत्री राजनाथ सिह यांनी संसदेत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, काल दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरला विलिंग्टनमध्ये लँड व्हायचं होतं. सुलूर येथील एअरबेसवरील एअर ट्राफिक कंट्रोलनं 12.08 हेलिकॉप्टर वरील आपलं नियंत्रण गमावलं. थोड्या वेळानंतर सुलूर स्थानिक लोकांनी जंगलात आग लागल्याचं पाहिलं. तिथं त्यांना मिलटरीच्या हेलिकॉप्टरला आगीत असल्याचं पाहिलं. त्यानंतर स्थानिक प्रशासनाचं पथक तिथं पोहोचले आहेत.

सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखवींदर सिंग लिठ्ठर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान, स्क्वेड्रन लीडर कुलदीप सिंग, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर अरक्कल प्रदीप, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर हरवींदर रॉय, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर राणा प्रताप दास, लान्स नायक बी साई तेजा, लान्स नायक गुरुसेवक सिंग, लान्स जितेंद्र कुमार यांच्या पार्थिवाला विशेष विमानानं दिल्लीत आणले जाणार असल्याचे सिह यांनी सांगितले.

एअरफोर्सचे प्रमुख चौधरी यांनी काल घटनास्थळावर जाऊन घटनास्थळ आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये पाहणी केली. एअरमार्शल मानवेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह सर्व शहीद जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे राजनाथ सिंग म्हणाले.