चीनची खैर नाही! भारतीय लष्कर शक्तिशाली टी-९० भीष्म टॅंक गलवान खोऱ्यात करणार तैनात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव टिपेला पोहोचला आहे. चीनकडून सातत्यानं मोठा फौजफाटा सीमेवर तैनात होत असलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सुद्धा तयार आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात १४ हजार फूट उंचीवर सहा टी-९० टँक तैनात केले आहेत. हे टँक क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत.

आज चुशुल येथे भारत आणि चीनच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे. गलवान खोऱ्यात नदी काठाजवळ चीनने ज्या आक्रमक पद्धतीने सैन्याची जमवाजमव करुन शस्त्र सज्जता ठेवली आहे. ती लक्षात घेऊनच भारतीय सैन्याने इतक्या उंचावरील भागात टी-९० भीष्म टँक तैनात करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

या भागात उंचावरील क्षेत्रात भारतीय सैन्य महत्त्वाचा ठिकाणी तैनात आहे. पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या १५९७ किलोमीटरच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याने युद्ध वाहनांसह १५५ एमएम हॉवित्झर तोफाही तैनात केल्या आहेत. चीनच्या कुठल्याही आव्हानाला प्रयुत्तर देण्यासाठी चुशुल सेक्टरमध्ये २ टँक रेजिमेंट तैनात केल्या आहेत. चीनला एक इंचही भूमी द्यायची नाही. उलट यापुढे चीनची कुठलीही दादागिरी खपवून घ्यायची नाही अशी भारताची भूमिका आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment