IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये (IND vs ENG) टीम इंडियाचा दारूण पराभव झाला, याचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (IND vs ENG) बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले 2 पॉईंट्स कापण्यात आले तसेच टीमला (IND vs ENG) मॅच फीच्या 40 टक्के दंडही आकारण्यात आला. भारतीय टीम निर्धारित वेळेच्या दोन ओव्हर मागे राहिल्यामुळे मॅच रेफ्री डेव्हिड बून यांच्याकडून हि कारवाई करण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे (IND vs ENG) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये आता भारताची टीम एक स्थान खाली चौथ्या क्रमांकावर आली आहे, तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ‘खेळाडू आणि सहयोगी स्टाफसाठी आयसीसीच्या आचार संहितेचा नियम 2.22 नुसार प्रत्येक ओव्हर कमी टाकली तर मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (IND vs ENG) नियम 16.11.2 नुसार प्रत्येक ओव्हरसाठी एक पॉईंट रद्द केला जातो, टीम इंडिया दोन ओव्हर मागे राहिल्यामुळे त्यांचे 2 पॉईंट्स कापण्यात आले असे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने आयसीसीची शिक्षा मान्य केली आहे.

पाकिस्तानची टीम इंडियासाठी ठरू शकते अडथळा?
टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (IND vs ENG) दुसऱ्या सत्रात आतापर्यंत 4 सीरिज खेळल्या, यातल्या 2 भारतात तर उरलेल्या 2 परदेशात होत्या. 6 विजय, 4 पराभव आणि 2 ड्रॉसह भारताचे पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स 52.08 आहेत. तर पाकिस्तानचे पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स 52.38 आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताला अजून दोन सीरिज खेळायच्या आहेत. यामधील एक होमग्राउंडवर तर दुसरी परदेशात होणार आहे. तर पाकिस्तान आणखी 7 टेस्ट खेळणार आहे. यातल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या 5 टेस्ट ते घरच्या मैदानात खेळतील, तर उरलेल्या 2 टेस्ट श्रीलंकेत होणार आहेत, त्यामुळे पाकिस्तानची टीम इंडियासाठी अडचण निर्माण करू शकते.

हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

Leave a Comment