Thursday, March 30, 2023

देश भाषणात प्रथम मात्र खेळात मागे; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केली खंत

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज सोलापूरमध्ये २३ व्या  महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आले होते.

दरम्यान आपला देश भाषण देण्यात जगात अग्रेसर आहे मात्र खेळामध्ये मागे आहे. ऑलम्पिक स्पर्धेत एक किंवा दोन पदकापर्यंतच आपण मर्यादित राहतोय, सव्वाशे करोड लोकसंख्येचा आपल्या देशाची ऑलम्पिकमध्ये सुमार कामगिरी आहे यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे अशी खंत महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

सोलापूर विद्यापीठाकडून पहिल्यांदाच या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेमध्ये राज्यातील २० विद्यापीठांचे ३००० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत.