Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम

Gold ATM
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आतापर्यंत तुम्ही ऑटोमेटेड ट्रेलर मशीन म्हणजेच एटीएम मशीन पहिले असेल ज्यामधून आपण सहज कॅश काढू शकतो. पण आता तुम्ही रोख रकमेऐवजी थेट एटीएममधून सोन्याची नाणी (Gold ATM) काढू शकता. जगातील पहिले रिअल टाईम गोल्ड एटीएम (Gold ATM) हे हैदराबादमध्ये बसवण्यात आले आहे. या एटीएममधून तुम्हाला सोन्याची नाणी काढता येतात. गोल्डसिक्का या कंपनीकडून हे एटीएम बसवण्यात आले आहे. या एटीएममधून 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची नाणी काढता येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

याचा वापर कसा करता येईल?
सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गोल्डसिक्काचे सीईओ सी. तरुज यांच्या मते लोक या एटीएमचा वापर करून 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी खरेदी करू शकतात. या एटीएमवरील (Gold ATM) सोन्याची किंमत थेट अपडेट केली जाईल. एटीएममधून सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकतात. तसेच कंपनी पेड्डापल्ली, वारंगल आणि करीमनगरमध्ये सोन्याचे एटीएम उघडण्याचा विचार करत असल्याचे गोल्डसिक्काचे सीईओ सी. तरुज यांनी सांगितले आहे. पुढील 2 वर्षांत भारतभर सुमारे 3,000 गोल्ड एटीएम ATM उघडण्याची कंपनीची योजना आहे.

सोने खरेदीसाठी 24 तास सुविधा…
गोल्ड एटीएममधून (Gold ATM) वितरित होणाऱ्या सोन्याची किंमत थेट बाजार दरांच्या आधारावर अपडेट केली जाईल. म्हणजेच बाजारभावानुसारच त्यातून सोने काढता येते. याचबरोबर एटीएम 24*7 उपलब्ध असणार आहे. कोणताही ग्राहक या एटीएममधून डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे सोने काढू शकतो.

Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या