नवी दिल्ली । भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 52,972 नवीन रुग्ण आढळले असून 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात जास्तीत जास्त रुग्ण वाढण्याच्या बाबतीत आज भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 47 हजार तर ब्राझीलमध्ये 25 हजाराहून अधिक नवीन रुग्ण वाढले आहेत.
आता देशात एकूण रुग्णांची संख्या 18 लाखाहून अधिक आहे. ज्यामध्ये 38 हजार 135 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सुमारे 12 लाख लोक बरे झाले आहेत, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 5.79 लाखाहून अधिक आहे. महाराष्ट्र, दिल्ली नंतर बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशात कोरोना संक्रमणाची गती वाढत आहे.
गेल्या 24 तासांत भारतात 52 हजार 971, अमेरिकेत 47 हजार 511, ब्राझीलमध्ये 25 हजार 800, पेरूमध्ये 21 हजार 358, कोलंबियामध्ये 11 हजार 470, दक्षिण आफ्रिकेत 8195, रशियामध्ये 5387, अर्जेंटिनामध्ये 5376, फिलिपिन्समध्ये 4953 आणि मेक्सिकोमध्ये 4853 नवीन रुग्ण वाढले आहेत.
अमेरिकेत एकूण रुग्णांची संख्या 48 लाखांच्या वर गेली आहे. ज्यामध्ये 1 लाख 58 हजार 365 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 लाख लोकं बरे झाले आहेतय. सध्या 22 लाख लोकांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांच्या यादीत अमेरिकेनंतर ब्राझीलचा क्रमांक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”