जकार्ता | उपांत्य फेरीत इराणकडून अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय पुरुष कबड्डी संघाच्या सुवर्णपदक मिळवण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. १८ व्या आशियाई स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात इराणने भारताचा २७-१८ असा पराभव केला. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारत पहिल्यांदाच अंतिम सामना खेळू शकणार नाही. पूर्वार्धात ११-१० ने आघाडीवर असणारा भारतीय संघ उत्तरार्धात मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरला. आता कांस्यपदकासाठी भारताची लढत पाकिस्तानशी होईल.
दुसरीकडे महिला संघाने मात्र उपांत्य फेरीत चायनीज तायपैइ संघाचा २७-१४ असा पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली.