हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोदी सरकारला चिमटे काढले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या निमित्त शशी थरूर बोलत होते. शशी थरूर म्हणाले, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाला लिप सर्व्हिस देण्यात आली पण स्टँड अप इंडियाचा उल्लेख नाही कारण तुम्ही स्टँड-अप कॉमेडियन्सवर बंदी घालण्यात व्यस्त आहात. सरकारी योजनांना खरोखर सिट डाउन इंडिया, शटडाउन इंडिया आणि शट-अप इंडिया अशी नवे दिली पाहिजेत.
पत्रकार अर्णब गोस्वामीला विमानात प्रश्न विचारल्याबद्दल इंडिगो एअरलाईन्सने कॉमेडियन कुणाल कामरावर ६ महिन्यांची बंदी घातली आहे. याचा संदर्भाने शशी थरूर यांनी मोदी सरकारवर टिका केली.