India-Pakistan War : AI ची भविष्यवाणी!! युद्ध झाल्यास भारतासमोर पाकिस्तान किती दिवस टिकणार??

India-Pakistan War
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India-Pakistan War । पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची चिन्हे आहेत. भारताने पक्षविरोधी आक्रमक भूमिका घेत अनेक मोठे निर्णय घेतलेत, त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तान कडून भारताला अणुबॉम्बची धमकी दिली जातेय… या एकूण पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानात कधीही युद्ध होऊ शकत अशी परिस्थिती निर्माण झालीय. पाकिस्तानी सैन्य भारताविरोधात ताकत दाखवण्यासाठी पोकळ शक्ती प्रदर्शन करत आहे. दोन दिवसात पाकिस्तानने दोन क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. तर दुसरीकडे भारतानेही आपल्या पुढच्या पिढीची अत्याधुनिक नेक्स्ट जेनरेशन मिसाइल ब्रह्मोसला वॉर ड्यूटीवर तैनात केलं आहे… पाकिस्तानला स्वत:च्या युद्ध क्षमतेवर विश्वास नसल्यामुळे पाकिस्तानी टॉप जनरल्समध्ये चिंता आहे. पाकिस्तानी सैन्याकडे लढण्यासाठी दारुगोळ्याचा साठा अत्यंत कमी आहे.अशावेळी जर युद्ध झालं तर या युद्धात पाकिस्तान किती काळ तग धरू शकतं याबाबत Grok AI ने उत्तर दिले आहे.

काय आहे Grok AI चे उत्तर? India-Pakistan War

Grok च्या मते भारताविरुद्धच्या युद्धात (India-Pakistan War) पाकिस्तान 4 ते 10 दिवसांत पराभूत होऊ शकतो. याचे कारण त्यांची कमकुवत अर्थव्यवस्था, मर्यादित इंधन आणि दारूगोळा साठा, आणि भारताच्या तुलनेत कमी तांत्रिक प्रगती आहे. भारताची सैन्य ताकद, तांत्रिक प्रगती, आणि आर्थिक स्थिरता यामुळे युद्धात भारताचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. जर युद्ध मर्यादित स्वरूपाचे असेल (उदा., कारगिलसारखे), तर पाकिस्तान 2-3 आठवडे टिकू शकतो, परंतु भारताच्या प्रबळ हवाई आणि जमिनीवरील पॉवर मुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागेल. पाकिस्तानची अर्थव्यवस्था IMF च्या देखरेखीखाली आहे, आणि दीर्घकालीन युद्धासाठी त्यांच्याकडे संसाधने अपुरी आहेत. याउलट, भारताची अर्थव्यवस्था आणि स्वदेशी हथियार उत्पादन क्षमता युद्धाला अधिक काळ पाठबळ देऊ शकते.

हे पण वाचा : महाराष्ट्रातील 16 ठिकाणी उद्या युद्धाची मॉकड्रील; कुठे वाजणार सायरन?

कोणाची ताकद किती?

भारताकडे सध्या 14.5 लाख सक्रिय सैनिक, 11 लाख राखीव सैनिक, 4,600+ टँक, 2,000+ लढाऊ विमाने आणि अत्याधुनिक मिसाइल सिस्टीम आहेत. भारतीय नौदल “ब्लू-वॉटर” क्षमतेचे आहे, जे दीर्घकालीन समुद्री ऑपरेशन्ससाठी सक्षम आहे. भारताची 88% दारूगोळा देशातच तयार होतो, ज्यामुळे युद्धकालीन पुरवठा साखळी मजबूत आहे. याशिवाय भारताला अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जपान यांसारख्या देशांचे समर्थन आहे.

दुसरीकडे पाकिस्तान बद्दल सांगायचं झाल्यास, पाकिस्तानकडे 6.54 लाख सक्रिय सैनिक, 5 लाख राखीव सैनिक, 3,742 टँक आणि सुमारे 1,400 लढाऊ विमाने आहेत. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे. पाकिस्तानकडे इंधन, दारूगोळा आणि हथियारांचा तुटवडा आहे. काही अहवालांनुसार, पाकिस्तानकडे फक्त 4-7 दिवसांचा युद्धपुरवठा आहे. पाकिस्तानला चीन आणि काही प्रमाणात तुर्की यांचे समर्थन आहे, परंतु आंतरराष्ट्रीय अलगाव त्यांच्यासाठी अडचण ठरू शकतो.