हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांनी युद्धाच्या तयारीच्या दिशेने पाऊल टाकल्याने युद्ध (India-Pakistan War) अटळ दिसतंय…. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याला फ्री हॅन्ड दिल्यानंतर पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भीती आहे. त्यामुळे, पाकिस्तानी नेते, आणि पत्रकार भारतीय हल्ल्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. दिल्लीत उच्चायुक्त असलेले माजी पाकिस्तानी राजनयिक अब्दुल बासित यांनी तर भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करेल याची तारीखच सांगून टाकली आहे. भारत १० किंवा ११ मे रोजी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असं अब्दुल बासित यांनी म्हंटल आहे. याबाबत त्यांनी ट्विट सुद्धा केलं आहे.
हे पण वाचा : AI ची भविष्यवाणी!! युद्ध झाल्यास भारतासमोर पाकिस्तान किती दिवस टिकणार??
काय आहे अब्दुल बासित यांच ट्विट? India-Pakistan War
अब्दुल बासित यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल, “रशियाच्या विजय उत्सवानंतर भारत 10 किंवा 11 मे रोजी पाकिस्तान विरुद्ध मर्यादीत स्वरुपाची कारवाई करु शकतो” सध्या अब्दुल बासित यांनी भारतीय वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देण्याचा सपाटा लावला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या सध्याच्या स्थितीबद्दल ते सातत्याने मत प्रदर्शन करत आहेत. यापूर्वीही एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल बासित म्हणालेले की, “भारत काही ना काही कारवाई करणार, या बद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही. कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जाहीर केलेलं की, ते कारवाई जरुर करणार.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी त्यांच्या लष्करी तयारी तीव्र (India-Pakistan War) केल्या आहेत. भारताने अनेक राज्यांमध्ये सुरक्षा सराव सुरू केला असताना पाकिस्तानने अलीकडेच ४५० किमी पल्ल्याच्या अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील अनेक राज्यांना युद्धसज्जतेच्या धर्तीवर मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत. युद्धकाळातील उपायांचा सराव या मॉक ड्रीलअंतर्गत घेतला जाणार असून यादरम्यान नागरिकांनी युद्धजन्य परिस्थिती आणि हवाई हल्ल्यांदरम्यान स्वत:चं आणि इतरांचं संरक्षण नेमकं कसं करायचं यासंदर्भातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे मॉक ड्रील उद्या होणार आहे. यावेळी हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जाणार आहेत. तसंच ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षणही यावेळी दिले जाणार आहे.




