हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध वॉर (India Pakistan War) चांगलंच सुरु झालं आहे. दोन्ही बाजूनी एकमेकांवर मिसाईल, ड्रोन हल्ला करण्यात येतोय. पाकिस्तान भारतविरोधी कुरापती काय कमी करायचं नाव घेईना, दुसरीकडे भारत सुद्धा पाकच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. भारतीय सैन्यदलाने वायूदल, हवाईदल आणि पायदळ या तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला इंगा दाखवला आहे. भारतासमोर आपलं काहीच चालेना हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तान कडून पुन्हा एकदा भेकड हल्ला करण्याचा प्लॅन सुरु झालाय. पाकिस्तानने काही तासांपूर्वी अरबी समुद्रातील गुजराती मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत. या मच्छिमारांना पाकिस्तानने जिवंत सोडले असले तरी भारतीय बोटी त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा मुंबईवर झालेल्या 26/ 11 हल्ल्याप्रमाणे समुद्री मार्गाने भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे का? या शक्यतांना जोर आला आहे.
मुंबईवर २००८ साली झालेला २६/११ दहशतवादी हल्ला अजूनही भारतीय विसरलेले नाहीत. त्यावेळी अरबी समुद्राच्या माध्यमातूनच अजमल कसाब आणि त्याचे इतर साथीदार मुंबईत आले होते. त्यांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉय इथे नागरिकांवर बेधुंद गोळीबार केला होता. भारताच्या आणि मुंबईच्या इतिहासात आजही तो दिवस काळा दिवस म्हणून मानला जातो. मुंबई हि नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहे. देशावर सूद उगवायचा असेल तर अतिरेक्यांकडून सतत मुंबईवर हल्ला केला जातो हा इतिहास आहे. आताही देशातील एकूण युद्धजन्य परिस्थितीच्या (India Pakistan War) पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अरबी समुद्रातून पाकिस्तानच्या घुसखोरीच्या शंकेमुळे मच्छीमारांनाही सावध करण्यात आले आहे.
हे पण वाचा : मुंबईत ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात
मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा- India Pakistan War
भारतीय नौदलाने मुंबईत मच्छिमारांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. या काळात, नौदलाने मच्छिमारांना संवेदनशील भागात मासेमारीला जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. या क्षेत्राल बोटी आढळ्यास शूट-टकिल चे आदेश देण्यात आले आहेत. ऑईल-रिग सारख्या क्षेत्रात मासेमारीला जाऊ नये अथवा वादळा पासून वाचण्याकरिता त्या क्षेत्राचा आश्रय घेऊ नये. पाकिस्तानकडून २६/११ च्या मुंबई हल्ल्याप्रमाणे या बोटींचा वापर केला जाऊ शकतो, त्यामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मुंबईतील मासेमारी बोटींचे लवकरच सर्वेक्षण केले जाईल आणि त्यांचा डेटा अॅपच्या मदतीने गोळा केला जाईल असेही सांगण्यात आलं आहे.




