RBI च्या स्पष्टीकरणामुळे NBFC चे बुडित कर्ज वाढण्याची India Ratings ला भीती

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नॉन-परफॉर्मिंग एसेट (NPA) बाबत स्पष्टीकरण दिल्यामुळे, नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) चे बुडित कर्ज (NPA) एक तृतीयांशने वाढू शकेल. देशांतर्गत रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने शुक्रवारी जारी केलेल्या आपल्या रिपोर्ट्समध्ये ही भीती व्यक्त केली गेली आहे. त्यात म्हटले गेले आहे की,’NPA बाबत RBI च्या नुकत्याच स्पष्टीकरणामुळे NBFC चे बुडीत कर्ज सुमारे एक तृतीयांशने वाढू शकते.’

RBI ने मागच्या महिन्यात बँका, NBFC आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थांसाठी IRAC (Income Recognition Asset Classification and Provisioning) नियमांवरील स्थिती स्पष्ट केली आहे.

या स्पष्टीकरणात, RBI ने म्हटले होते की,” विशेष उल्लेख खाते अर्थात SMA (Special Mention Account) आणि NPA चे वर्गीकरण दैनंदिन स्थितीच्या आधारावर केले जावे आणि सर्व प्रलंबित देय रक्कम भरल्यानंतरच NPA मानक कॅटेगिरीमध्ये टाकले जाऊ शकेल.”

मात्र, इंडिया रेटिंग्जचा असा विश्वास आहे की, NPA साठी आर्थिक तरतूद केल्याने परिणाम मध्यम होऊ शकतो. असे असूनही, ही IRAC आवश्यकतांपेक्षा जास्त पारंपारिक अशी व्यवस्था आहे. या रिपोर्ट्स नुसार, RBI च्या सर्कुलरमध्ये अकाउंट्सच्या दैनंदिन पडताळणीबद्दल देखील सांगितले गेले आहे. जेणेकरुन हे कळू शकेल की, कर्ज किती दिवसांपासून थकित आहे. रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे की,;या व्यवस्थेमुळे खात्यांसाठी NPA पुष्टीकरणाचा दर देखील वेगवान होऊ शकतो.’

NBFC चे कर्जदार सहसा काही दिवस उशिराने त्यांची थकबाकी भरतात. मात्र या नवीन व्यवस्थेत काही दिवसांचाही उशिर झाल्यास त्यांचे खाते NPA म्हणून लिस्ट केले जाऊ शकते. यामुळे NBFC च्या NPA चे आकडे वाढतील, असा विश्वास इंडिया रेटिंग्जला आहे.

You might also like