भारत रशियाकडून खरेदी करणार आण्विक पाणबुडी; पश्चिम समुद्री ताफ्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। सातत्याने शत्रूराष्ट्राकडून घुसखोरीची शक्यता असलेल्या पश्चिम समुद्री ताफ्याला आता आण्विक पाणबुडी मिळण्याची अपेक्षा आहे. अशी पाणबुडी रशियाकडून खरेदी करण्याचा करार अंतिम टप्प्यात आला असून, ही पाणबुडी याच महिन्यात नौदलाकडे सुपूर्द होणार आहे. त्यानंतर ती महिनाभरात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या फक्त दोन आण्विक पाणबुड्या आहेत. त्यापैकी ‘आयएनएस अरिहंत’ ही पाणबुडी भारतातच तयार झाली आहे, तर ‘आयएनएस चक्र’ ही पाणबुडी रशियाकडून खरेदी करण्यात आली. या दोन्ही पाणबुड्या सध्या पूर्व कमांड अंतर्गत विशाखापट्टणम येथे तैनात आहेत; परंतु भारतीय किनारपट्टीला अधिक धोका अरबी समुद्रातून आहे. त्यामुळे मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम कमांडमध्ये अशी पाणबुडी तैनात होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आता नौदलाने रशियाकडून खरेदी केलेली दुसरी आण्विक पाणबुडी मुंबईत येण्याची दाट चिन्हे आहेत.

शियाच्या ‘अकुला’ श्रेणीतील ही पाणबुडी खरेदी करण्यासंबंधी भारत व रशियादरम्यानचा करार पूर्ण झाला आहे. रशिया कुठल्याही क्षणी ही पाणबुडी नौदलाच्या सुपूर्द करण्यास तयार आहे

Leave a Comment