Saturday, February 4, 2023

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारत देणार १० मिलियन डॉलर्सची मदत- पंतप्रधान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभर पसरत चाललेल्या कोरोनाव्हायरस आजाराशी लढण्यासाठी आता विविध देश एकवटू लागले आहेत. पाश्चात्य राष्ट्रांमधून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असताना आता साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन म्हणजेच सार्क देशांनीही एकत्र येत कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शड्डू ठोकला आहे.

रविवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातर्फे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी १० मिलियन अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. 

- Advertisement -

 कोरोना व्हायरसचा धोका जगाबरोबरच देशातही वाढला आहे. सोमवारपर्यंत देशभरात 116 जणांना कोरोनाची  लागण झाल्याचे समोर आले आहे. यात 17 परदेशी नागरिगांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी ही मदत जाहीर केली आहे.