वॉशिंग्टनंची एकाकी झुंज; भारत पहिल्या डावात ३३७ वर गारद; फॉलोऑनबाबत इंग्लंडने घेतला ‘हा’ निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई । भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३३७ धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यानं दमदार खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर आव्हान उभं केलं होतं, परंतु आर अश्विन ( R Ashwin) वगळता तळाच्या अन्य फलंदाजांची त्यांना साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला पहिल्या डावात २४१ धावांची पिछाडी सहन करावी लागली. आणि इंग्लंडला भारताला फॉलोऑन देण्याची संधी मिळाली. मात्र, इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा इंग्लंडचा निर्णय घेतला आहे.

तत्पूर्वी, इंग्लंडनं पहिल्या डावात उभा केलेला ५७८ धावांचा डोंगर सर करताना टीम इंडियाची दमछाक झाली. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शुबमन गिल हे आघाडीचे फलंदाज फार काही करू न शकल्यानंतर टीम इंडियाचं काही खरं नव्हतं. पण, रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी टीम इंडियाच्या धावांचा मजबूत पाया रचला. पुजारा दुदैवी रित्या माघारी परतला, पण रिषभची फटकेबाजी सुरूच होती. रिषभचं शतक पुन्हा हुकलं आणि तो ९१ धावांवर माघारी परतला.

वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी अनपेक्षित कामगिरी करून दाखवली. घरच्या मैदानावर खेळताना या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी ८० धावांची भागीदारी केली. अश्विन ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन दमदार फटकेबाजी करू लागला. त्याच्या आक्रमक खेळीनं सर्वांना अवाक् केलं. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन त्यानं मारलेला षटकार थक्क करणारा होता. आर अश्विन ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने आक्रमक खेळ केला. पण, अन्य फलंदाजांनी माना टाकल्या. वॉशिंग्टन १३८ चेंडूंत १२ चौकार व २ षटकार मारून ८५ धावांवर नाबाद राहिला.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment