हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : न्यूझीलंडकडून दुसर्या वनडे सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑकलंडमध्ये 22 धावांनी न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आणि तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताचा सलग दुसरा पराभव होऊन भारताने ही मालिकाही गमावली. सलग पाच टी 20 सामने जिंकणाऱ्या भारताला वन डेमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. टी 20 शेर असणारा भारतीय संघ वन डे मध्ये ढेर झाला.
पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडने 4 विकेट्सने जिंकला होता. यानंतर दुसर्या एकदिवसीय सामन्यातही किवी संघाने भारताला मालिकेत 2-0 ने नमवून अपराजित आघाडी घेतली आहे. मालिकेचा शेवटचा एकदिवसीय सामना 11 फेब्रुवारी रोजी माउंट मौनगुनी येथे खेळला जाईल. हा अखेरचा सामना जिंकून टीम इंडिया व्हाईट वॉश टाळण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.