India Vs Pakistan War : मोठी बातमी!! पाकिस्तानला 57 मुस्लिम देशांचा पाठिंबा? नेमकं काय घडतंय?

India Vs Pakistan War OIC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India Vs Pakistan War । जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांना ठार केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध ताणले गेले आहेत… भारताने सिंधू नदीचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानचा आगबांबोटा झालाय.. पाकिस्तानकडून युद्धाची भाषा केली जातेय.. दुसरीकडे भारताने सुद्धा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतलाय… कोणत्याही परिस्थितीत मृत पर्यटकांना न्याय मिळवून देईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवायसीयांना दिली आहे… त्यामुळे पाकिस्तानही बिथरला आहे… भारत कोणत्याही वेळी आपल्यावर हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानला वाटतेय… त्यामुळे पाकिस्तान आता मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. एका वृत्तानुसार, ५७ देशांची संघटना असलेल्या OIC (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) ने पाकिस्तानला पाठिंबा देण्याचे म्हटले आहे… त्यामुळे पाकिस्तानच बळ वाढलं आहे.

OIC चा पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेला पाठिंबा – India Vs Pakistan War

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच पाकिस्तानने दक्षिण आशियातील सध्याच्या परिस्थितीबद्दल ओआयसीला माहिती दिली होती, ज्यामध्ये भारताने केलेल्या कृतींना प्रादेशिक शांततेसाठी गंभीर धोका असल्याचे त्यांनी सांगितलं होते… यानंतर OIC राजदूतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेला एकता आणि पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी राजनैतिक संवादाद्वारे आणि प्रादेशिक तणावाची मूळ कारणे ओळखून तणाव कमी करण्याचे आवाहन केले. महत्वाचं म्हणजे या दरम्यान, जम्मू आणि काश्मीर वादाचा (India Vs Pakistan War) विशेषतः उल्लेख करण्यात आला आहे. काश्मीर प्रश्नाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि ओआयसीच्या ठरावांना पाकिस्तानच्या राजदूतांनी पाठिंबा दिला आहे.

हे पण वाचा : शाल विक्रेते, घोडेस्वार आणि दहशतवादी यांच्यात थेट कनेक्शन? शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा खळबळजनक खुलासा

न्यू यॉर्कमध्ये झालेल्या OIC (इस्लामिक सहकार्य संघटना) राजदूतांच्या बैठकीत पाकिस्तानने दक्षिण आशिया मुद्द्यावर आपली भूमिका आणि विचार मांडले. भारताने केलेली कारवाई “प्रक्षोभक, राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि बेजबाबदार” होती. ओआयसीच्या सदस्य देशांनी भारताच्या या भूमिकेचा आणि त्याच्या संभाव्य परिणामांचा पुनर्विचार करावा असे आवाहन संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी जारी केलेल्या निवेदनात केले आहे.

दरम्यान, भारताच्या हल्ल्याची पाकिस्तानला चांगलीच धास्ती आहे. त्याचाच भाग म्हणजे पाकिस्तानने पुढील १० दिवसांसाठी पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. एवढेच नाही तर पीओकेमध्ये असलेले १००० हून अधिक मदरसे तात्पुरते बंद केले आहेत. भारत या मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे मानून टार्गेट करेल असं पाकिस्तानला वाटतंय.