India Vs Pakistan War Mock Drill : महाराष्ट्रातील 16 ठिकाणी उद्या युद्धाची मॉकड्रील; कुठे वाजणार सायरन?

India Vs Pakistan War Mock Drill (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर येथील पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची नाकाबंदी केल्याने पाकचा जळफळाट झाला आहे… त्यातूनच पाकिस्तान कडून युद्धाची भाषा केली जातेय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील अनेक राज्यांना युद्धसज्जतेच्या धर्तीवर मॉक ड्रील घेण्याचे आदेश (India Vs Pakistan War Mock Drill) दिले आहेत. युद्धकाळातील उपायांचा सराव या मॉक ड्रीलअंतर्गत घेतला जाणार असून यादरम्यान नागरिकांनी युद्धजन्य परिस्थिती आणि हवाई हल्ल्यांदरम्यान स्वत:चं आणि इतरांचं संरक्षण नेमकं कसं करायचं यासंदर्भातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे मॉक ड्रील उद्या होणार आहे. यावेळी हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जाणार आहेत. तसंच ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षणही यावेळी दिले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, नाशिक, नागोठणे, मनमानड, सिन्नर, थळवायशेत, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणी हे मॉकड्रील पार पडेल. India Vs Pakistan War Mock Drill

हे पण वाचा : AI ची भविष्यवाणी!! युद्ध झाल्यास भारतासमोर पाकिस्तान किती दिवस टिकणार??

मॉकड्रीलमध्ये नेमकं काय होणार? India Vs Pakistan War Mock Drill

हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाणार
हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार
सामान्य नागरिकांना बचावकार्याचं प्रशिक्षण दिलं जाणार
महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येणार
रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणं समजू नये यासाठी ब्लॅकआऊटचं प्रशिक्षण देणार
घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचं महत्त्वं पटवून दिलं जाणार

1971 मध्येही राज्याराज्यात मॉक ड्रील घेण्यात आलं होतं-

दरम्यान यापूर्वी 1971 मध्येही पाकिस्तान विरोधात युद्धाचे ढग जमा झाल्यावर संपूर्ण देशभरात मॉक ड्रील घेण्यात आलं होतं. तेव्हाही शहरात सायरन वाजायचे, ब्लॅक आऊटचा सरावही केला जायचा असा अनुभव आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात.