टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘ही’ आहे राहुल द्रविडची सपोर्ट टीम

Rahul Dravid
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेचे वेळापत्रक अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआय या संघासोबत निवड समितीचे सदस्य अभय कुरुविला आणि देबाशिष मोहंती यांनासुद्धा पाठवणार आहेत. अभय व देबाशिष हे दोघे मुंबईतच आहेत आणि ते श्रीलंकेला जाणाऱ्या सदस्यांसह क्वारंटाईन झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CQh69AEALDx/?utm_source=ig_embed&ig_rid=e5bec213-d8f1-40dc-887a-c2c0f42cafc3

या टीमचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे. राहुल द्रविड १८ सदस्यीय सहाय्यक सदस्यांसह मुख्य प्रशिक्षक म्हणून या संघाला मार्गदर्शन करणार आहे.आंतरराष्ट्रीय पॅनलचे माजी पंच सुधीर असनानी हे प्रबंधक म्हणून संघासोबत जाणार आहेत. भारतीय संघ येत्या सोमवारी श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या मालिकेला १३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

राहुल द्रविडची सपोर्ट टीम खालीलप्रमाणे
राहुल द्रविड ( मुख्य प्रशिक्षक), सुधीर आसनानी ( प्रबंधक), पारस म्हाम्ब्रे ( गोलंदाजी प्रशिक्षक), टी दिलीप ( क्षेत्ररक्षण प्रशिक्षक), आशीष कौशिक ( फिजिओ), नारायण पंडित ( फिजिओ), आनंद दाते ( ट्रेनर), एआय हर्ष ( ट्रेनर), अशोक साध ( सहाय्यक प्रशिक्षक – थ्रोडाऊन स्पेशालिस्ट), सौरव अंबडकर ( थ्रोडाऊन स्पेशालिस्ट), नंदन मांझी ( मालीश), मंगेश गायकवाड ( मालीश), एल वरूण ( विश्लेषक), आनंद सुब्रमण्यम ( मीडिया व्यवस्थापक), अमेय तिलक ) कंटेंट प्रोडुसर), अभिजीत साळवी ( टीम डॉक्टर), रवींद्र धोलपूरे ( भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा अधिकारी), सुमीत मल्लापुरकर ( लॉजिस्टिक्स मॅनेजर).

भारतीय संघ पुढीलप्रमाणे
शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया

नेट बॉलर्स – इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग

स्पर्धेचे वेळापत्रक
वन डे मालिका – 13, 16 व 18 जुलै, कोलंबो
ट्वेंटी-20 मालिका – 21, 23 व 25 जुलै, कोलंबो