लंडन | लॉर्ड्सवरील कसोटी सामन्यात भारताने नाट्यमयरित्या विजय मिळवला. भारत- इंग्लंड या सामन्यातून अटीतटीची लढत काय असते ते पाहायला मिळाली. लॉर्ड्स कसोटीत अखेरच्या दिवशी इंग्लडची टीम मँच जिंकणार की अनिर्णित ठेवणार याकडे जाणकारांचे लक्ष लागून होते. मात्र पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी अनपेक्षित कामगिरी केली. खऱ्या अर्थाने कसोटी सामना भारतीय गोलंदाजांनी जिंकून दिला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
कर्णधार विराट कोहलीच्या हातून बटलरचा कँच सुटल्याने सामना जिंकणार का हा प्रश्न निर्माण झाला होता. मोईन अली अन् जोस बटलर यांनी टीम इंडियाच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन चेंडूवर दोन विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. विराटनं ज्याचा झेल सोडला तो जोस बटलर भारताच्या मार्गात अजूनही उभा होताच. सिराजनं त्याचाही अडथळा दूर केला. भारतानं लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवला.
Eng vs Ind: All-round Bumrah and Siraj steal show at Lord's as visitors take 1-0 lead
Read @ANI story | https://t.co/pQblnFB9Xt#EngvInd pic.twitter.com/rf776TZlXJ
— ANI Digital (@ani_digital) August 16, 2021
शेवटी काही काळ टीम इंडियाला विजयासाठी 3 विकेट्स विजयासाठी पाहिजे होत्या, तर इंग्लंडला सामना अनिर्णित ठेवण्यासाठी 15 ओव्हर खेळून काढायची होत्या. एकेक षटक कमी होत होतं अन् विराटचं टेंशन पुन्हा वाढत जात होतं. विराटनं आक्रमक क्षेत्ररक्षण लावत दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 51 व्या षटकात जसप्रीतनं बुमराहने ऑली रॉबिन्सनला पायचीत केले. रॉबिन्सननं 35 चेंडूंत 9 धावा केल्या. आता भारताला 55 चेंडूंत 2 विकेट्स घ्यायच्या होत्या. पुढच्याच षटकात सिराजनं इंग्लंडची अखेरची होप बटलरला 25 धावांवर बाद केले. सिराजनं जेम्स अँडरसनची विकेट घेत भारताने 151 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा डाव 120 धावांवर गडगडला.
भारताकडून अजिंक्य रहाणे 61, मोहम्मद शमी नाबाद 56, चेतेश्वर पुजारा 45, जसप्रीत बुमराह नाबाद 34 धावा काढल्या. तर महम्मद सिराजने 4, जसप्रीत बुमराहने 3 आणि इशांत शर्मा 2, मोहम्मद शमी 1 यांनी विकेट घेतल्या.