राहुल-श्रेयसच्या झुंजार खेळीने भारताचा दमदार विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मर्यादित षटकांच्या सामन्यात संघातील आपली जागा पक्की केलेल्या लोकेश राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात झुंजार अर्धशतक झळकावलं. राहुलच्या पावलावर पाऊल ठेवलेल्या श्रेयस अय्यरनेही शानदार फटकेबाजी करत राहुलला दमदार साथ दिली. दोघांच्या या बहारदार खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १३२ धावांपर्यंत मजल मारली. सेफर्ट आणि मार्टिन गपटील या दोघांनीही ३३ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांकडून या सामन्यात टिच्चून गोलंदाजी केली गेली. रवींद्र जडेजाने २ तर बुमराह, मोहम्मद शमी आणि शिवम दुबे यांनी १ बळी घेतला.

भारतातर्फे धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर बाद झाले. त्यानंतर राहुल आणि श्रेयसने पुढील डाव सांभाळत संघाला विजयासमीप पोहचवलं. श्रेयस अय्यर ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर दुबे आणि राहुल यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.