Saturday, March 25, 2023

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखीन एक पदक निश्चित; पैलवान रवी कुमार फायनलमध्ये

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय पैलवान रवी दहियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये 57 किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव केलयामुळे तो सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर भारताचे ऑलिम्पिकमधील रौप्य पदक निश्चित झाले आहे.

टोक्यो ऑलिम्पिकच्या 57 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रवी कुमार दहिया याचा सामना कझाकिस्तानच्या नूरिसलामसोबत होता. यादरम्यान दोघांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. दोघामध्ये 6-6 मिनिटांमध्ये दोन राऊंड झाले. पहिल्या राऊंडमध्ये लीड बनवण्याच्या प्रयत्नात रवीकुमार नूरिसलामच्या डावपेचात अडकला. त्याचा परिणाम म्हणून रवीकुमार 7 पॉईंट्सने पिछाडीवर गेला. मात्र, मागे न हटता रवीकुमार दहीया याने शेवटच्या 50 सेकंदांमध्ये नूरिसलामचा चितपट केले आणि फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली.

- Advertisement -

रवीकुमार दहीया याने फायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे त्याने आपले रौप्य पदकही निश्चित केले आहे. आता फायनलमध्ये रवीकुमारकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. सुशीलकुमारनंतर कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवणारा रवीकुमार दुसरा भारतीय आहे.