भारताला दुसर पदक : टोकयो पॅरालिम्पिक्समध्ये उंच उडीत निशाद कुमारला तर टेबल टेनिसमध्ये भाविनाला राैप्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टोकयो | टोकयो पॅरालिम्पिक्समध्ये रविवारी दिवसभरात भारताला दुसरं मेडल मिळालं आहे. उंच उडी स्पर्धेमध्ये भारताच्या निशाद कुमार याला सिल्व्हर मेडल मिळालं आहे. निशाद कुमारने 2.06 मीटर लांब उडी मारत, फायनलमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. याच इव्हेंटमध्ये भारताचा रामपाल पाचव्या क्रमांकावर राहिला. टोकयो पॅरालिम्पिक्समधलं भारताचं हे दुसरं मेडल आहे. रविवारी सकाळी महिला पॅडलर भाविना पटेलने चंदेरी कामगिरी करत रौप्य पदकाला गवासणी घातली होती. भाविनाने देशाला रौैप्य मिळवून दिलं असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला आहे.

पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारा निशाद कुमार तिसरा भारतीय आहे. याआधी भाविना पटेलला राैप्य पदक मिळालं. तर 2016 साली दीपा मलिकनं ही कामगिरी केली होती. तिनं गोळाफेक स्पर्धेत 4.61 मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल पटकावले होते.

निशाद कुमारला सिल्व्हर मेडल मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं अभिनंदन केलं आहे. तर राहुल गांधींनीही निशाद कुमारचं कौतुक केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनी भारताला आणखी एक सिल्व्हर मेडल मिळालं. निशाद कुमारने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

गुजरात सरकारकडून भाविनावर बक्षिसाचा वर्षाव

गुजरातच्या मैहसाणा जिल्ह्यात एक छोटं दुकान चालवणारे हसमुखभाई पटेल यांची मुलगी भाविना यंदा पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावले अशी आशा खूपच कमी होती. याआधी तिने इतका अप्रतिम खेळ कधीच दाखवला नव्हता. पॅरालिम्पिकमध्ये तिने पहिला सामना पराभूत झाली होती. पण नंतर मात्र तिने एका पाठोपाठ एक असे सर्व सामने जिंकत अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतली. भाविनाच्या विजयामुळे सर्वच भारतीय आनंदी असून खासकरुन तिचं राज्य असणाऱ्या गुजरातमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे. भाविनाबेनने टोक्यो 2020 पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन केले जात असून गुजरात सरकारने भाविनाला बक्षिस म्हणून तीन कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment