स्मृती मंधानाने केली ‘हि’ मोठी चूक, भारताला मोजावी लागणार मोठी किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ब्रिस्टल : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेट टीम 7 वर्षानंतर टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय महिला टीमने याअगोदर शेवटची टेस्ट 2014 साली खेळली होती. यानंतर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात ब्रिस्टलमध्ये सीरिजच्या एकमेव टेस्टला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिला बॅटिंगचा निर्णय घेतला, पण दिवसाच्या सुरुवातीलाच स्मृती मंधानाने मोठी चूक केली आहे.

स्मृती मंधानाने सातव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला इंग्लंडची ओपनर विनफिल्ड हिलचा सोपा कॅच सोडला. झूलन गोस्वामीच्या बॉलिंगवर विनफिल्डच्या बॅटची कडा घेऊन बॉल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्मृतीच्या हातात गेला पण तिच्या हातातून हा सोप्पा झेल सुटला. आता विनफिल्ड हिल हिचा सुटलेला कॅच भारताला किती महागात पडेल हे लवकरच समजेल.

या सामन्यात भारताच्या शेफाली वर्माने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शेफाली वर्मा हि भारताकडून लहान वयात पदार्पण करणारी तिसरी महिला क्रिकेटपटू आहे. शेफालीचे वय 17 वर्ष 139 दिवस आहे. या अगोदर रजनी वेणुगोपालने 15 वर्ष 283 दिवस आणि सुलक्षणा कुलकर्णी यांनी 17 वर्ष 104 दिवसांचे असताना पहिली टेस्ट खेळली होती.

भारतीय महिला टीम
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, मिताली राज, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, शिखा पांडे

इंग्लंडची टीम
टॅमी ब्युमोंट, लॉरेन विनफिल्ड हिल, हिथर नाईट, नॅट स्किवेर, एमी जोन्स, सोफिया डंकली, जॉर्जिया एलविस, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्सेलेटन, आनया श्रुबसोले, कॅट क्रॉस

Leave a Comment