हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG Test) भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवत ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. या विजयासह ५ कसोटी सामन्यांची मालिका भारताने खिशात घातली आहे. शुभमन गिल आणि ध्रुव जोरेल यांच्या ७२ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारतीय संघ विजय मिळवू शकला. यष्टिरक्षक ध्रुव जुरेल सामन्याचा मानकरी ठरला.
कालच्या बिनबाद ४० धावसंख्येवरुन भारतीय संघाने डावाची सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा अनिता यशस्वी जयस्वाल अनुक्रमे ५७ आणि ३७ धावांवर बाद झाले. त्यानंतर रवींद्र जडेजा, रजत पाटीदार आणि सर्फराज खान हे मधल्या फळीतील फलंदाज लागोपाठ बाद झाल्याने भारतीय संघ संकटात सापडला. एकवेळ भारताची अवस्था १२०-५ अशी होती. त्यामुळे भारतीय संघ सामना हरतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शुभमन गिल आणि नवोदित विकेटकिपर ध्रुव जोरेल यांनी भारताचा डाव सांभाळला आणि संघाला विजय मिळवून दिला.
शुभमन गिलने ५२ धावा केल्या तर ध्रुव जोरेल ३९ धावांची उपयुक्त खेळी केली. दोघांनीही ७२ धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात ३९ धावांची महत्वपूर्ण खेळी करणारा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या विजयानंतर ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ अशी आघाडी घेतली आहे. तसेच मालिकेवर सुद्धा आपलं नाव कोरल. आता दोन्ही संघातील पुढील कसोटी सामना ७ मार्च पासून धर्मशाळा येथे खेळवण्यात येणार आहे.