भारतीय मागतायेत टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी; नेमकं काय आहे कारण घ्या जाणून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  26 जानेवारीपासून देशात शेतकरी आंदोलनानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याचं सरकारला ठणकावत आंदोलन सुरूच ठेवलं असून, आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. तर देशातील कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी देशाच्या सार्वभौमत्व व अखंडतेविषयी ट्विट केले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही यासंदर्भात भूमिका मांडली होती. त्यानंतर अचानक भारतीय टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी मागू लागले आहेत.

सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर बुधवारी मारिया शारोपोवाच्या फेसबुक पेजवर भारतीय नागरिक माफी मागत आहेत. “जेव्हा तू म्हणाली होतीस की, तू सचिन तेंडुलकरला ओळखत नाहीस, तेव्हा आम्ही तुझ्यावर टीका करण्यासाठी आलो होतो. पण आता नियतीनेच हे सिद्ध केलं आहे की एखाद्याला त्याच्याविषयी माहिती नसावी. तू बरोबर होतीस, मारिया. आम्ही माफी मागतो,” असं एकाने म्हटलं आहे.

दरम्यान भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असं ट्विट तेंडुलकरने म्हटलं होतं. त्याच्या या ट्विटवरून नाराजी उमटताना दिसली. सोशल मीडियावरून अनेकांनी सचिनच्या भूमिकेवर टीका केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment