भारत-चीन सीमेवरील तणावाच्या स्थितीत लष्करप्रमुख मनोज नरवणे थेट लेहमध्ये दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. लडाखमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेजवळ नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा त्यांनी फिल्ड कमांडर्सकडून समजून घेतला. लष्करप्रमुखांच्या कुठल्याही दौऱ्याची लष्कराकडून आधी माहिती दिली जाते. पण यावेळी कुठलीही माहिती किंवा फोटो सार्वजनिक करण्यात आले नाहीत.

लष्करप्रमुख नरवणे यांनी फॉरवर्ड भागांना भेट दिली नाही. पण १४ कॉर्प्सच्या मुख्यालयामध्ये त्यांनी फिल्ड कमांडर्सबरोबर प्रदीर्घ तास चर्चा केली. यावेळी उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी त्यांच्यासोबत होते. लडाखमधील ४ भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये प्रामुख्याने संघर्ष आहे. कुठल्याही परिस्थितीची चीनची दादागिरी सहन न करण्याची भारताची रणनिती आहे. त्यानुसार चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जात आहे.

दोन आठवडयांपूर्वी पूर्व लडाखच्या पॅनगॉंग टीएसओ तलावाच्या भागात भारतीय आणि चिनी सैनिक परस्परांना भिडले होते. त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. लडाखमध्ये भारतीय सैनिकांच्या गस्त घालण्यावर तसेच रस्ता बांधणीवरही चीनने आक्षेप घेतला आहे. पूर्व लडाखच्या पॅनगॉंग टीएसओ तलावाच्या भागात चीनने गस्त वाढवली असून नौकांची संख्या देखील वाढवली आहे. तर भारतानेही अतिरिक्त सैन्य तुकड्या या भागात तैनात केल्या आहेत. या तणावाच्या परिस्थितीत लष्करप्रमुखांचे लेहमध्ये दाखल झाल्याचे म्हटलं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment