व्हिडिओ: भारतीय सैन्याचा पाकिस्तानला ‘ईट का जवाब पत्थर से’; तोफगोळे डागून उद्धवस्त केल्या पाकिस्तानी चौक्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याची आज भारतीय सैन्याने चांगलीच जिरवली. भारतीय सैन्याने कुपवाडा सेक्टरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्धवस्त केल्या. या धडकी भरवणाऱ्या कारवाईचा व्हिडीओ भारतीय सैन्याने पोस्ट केला असून, यात पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या नेस्तनाबूत झाल्याचे दिसत आहे.

भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इशारे देऊन सुद्धा जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच होते. मात्र, पाकिस्तान काही कुरापाती थांबवायला तयार नसल्याने अखेर भारतीय सैन्याने आज पाकिस्तानी चौक्या उडवून त्यांना चांगलीच अद्दल घडवली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment