धक्कादायक! ट्रेनमध्ये जवानाची गोळी झाडून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर | गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरमित सिंग असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमधून हरमित सिंग हा जवान प्रवास करत होता. पण या जवानाने ट्रेनमध्ये स्वत:च्याच सर्व्हिस गनमधून गोळ्या झाडून घेतल्या. अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने ट्रेनमधील प्रवाशी प्रचंड घाबरले. त्यानंतर जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या असल्याची माहिती समोर आली. यामधे जवानाचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्या केलेल्या हरमित सिंग या जवानाचा मृतदेह मध्य प्रदेशमधील पांढुर्णा इथं उतरवण्यात आला आहे. जवानाच्या आत्महत्येचं कारण अजूनपर्यंत समोर आलेलं नाही. तसंच हा जवान कुठला रहिवासी आहे, हेदेखील स्पष्ट झालेले नाही. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जवानाचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. जवानाने आपला जीव का संपवला, तसंच हा जवान नेमका कुठला आहे, याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत

Leave a Comment