हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जे तरुण भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरी करू इच्छितात अशा तरुणांनी तर ही बातमी आवश्यक वाचावी. कारण, भारतीय सैन्याच्या अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेकच्या एकूण 381 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याबाबतची नुकतीच नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 16 जुलै अर्जांची अंतिम तारीख असेल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पात्रता आणि वयोमर्यादा जाणून घ्या….
ही रिक्त पदे जाणार भरली
समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक भरती अंतर्गत एकूण 381 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन 64 (Male) अंतर्गत एकूण 350 रिक्त पदे भरली जातील. तर शॉर्ट सर्व्हिस कमिशन 35 (Female) ची एकूण 29 रिक्त पदे भरण्यात येतील. यासह जातील.एसएससी (W) टेक्निकलचे 1 पद तर एसएससी (W) नॉन टेक्निकल, नॉन यूपीएससीचे 1 पद भरण्यात येणार आहे. त्यामुळेच इच्छुक तरुणांसाठी ही संधी चांगली ठरू शकते.
या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. याबाबतचे अधिक माहिती joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. लक्षात ठेवा की या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै आहे. या भरतीसाठी अर्ज भरताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला विविध पदानुसार 56 हजार ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित अर्ज करावा.