हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे जेजूरीचे खंडेराय. जेजूरीचे खंडोबाचे मंदिर म्हणजे लाखों लोकांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे खंडोबाच्या दर्शनासाठी कितीतरी दुरून भाविक येत असतात. पण जर तुम्ही आता जेजूरीला दर्शनसाठी निघणार असाल तर थोडं थांबा कारण जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाने भाविकांसाठी एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार भारतीय वेशभूषेनुसार कपडे घातलेले असतील तरच तुम्हांला मंदिरात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय विश्वस्त मंडळातर्फे घेण्यात आला आहे.
भारतीय वेशभूषा परिधान केलेली असावी –
जेजूरीच्या खंडोबाचे दर्शन घ्यायचे असेल तर भारतीय वेशभूषा परिधान केलेली असावी. भारतीय वेशभूषेनुसार कपडे घातलेले असतील तरच तुम्हांला मंदिरात प्रवेश दिला जाईल. म्हणजेच मंडळच्या निर्णयानुसार जर तुम्ही शॉर्ट (कमी) कपडे घातले असतील किंवा फॅशन म्हणून फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट परिधान केलं असेल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही. हा नियम महिला आणि पुरुष दोघांसाठी असणार आहे. तसेच दर्शनसाठी येणार असाल तर तुम्ही कोणतेही भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली असेल तर सहज प्रवेश दिला जाईल असे जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाचे मुख्य विश्वस्त ‘अभिजीत देवकातेंनी’ माहिती दिली आहे.
खंडोबाची यात्रा व जत्रा –
आपल्या सर्वांना माहित आहे की, खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस असते आणि मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी या महिन्यात सहा दिवस, तसेच वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. खंडोबाची यात्रा म्हणजे भाविकांसाठी सगळ्यात मोठा दिवस असतो. कारण याच दिवसांमध्ये तुम्हांला जो काही नवस मागायचा आहे आणि जी काही इच्छा असेल त्यासाठी प्रार्थना करता येते. या यात्रेमध्ये कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक पद्धतीने खंडोबाच्या भक्तांना आपला नवस पूर्ण करता येतो.
तृप्ती देसाईंची या निर्णयावर भूमिका –
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी यांनी जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. “जेजुरीच्या खंडोबा देवस्थानने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. मंदिरात जातांना कोणीही तोकडे कपडे घालून जात नाही. असं असताना हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्यापासून असे निर्णय भक्तांवर लादले जात आहेत. वस्त्रसंहितेच्या नावाखाली घेण्यात आलेला हा निर्णय जेजुरी देवस्थानकडून मागे घेण्यात यावा,” अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे.