चिनी सैन्याचा भारतीय हद्दीत घुसण्याचा भारतीय सैनिकांनी हाणून पाडला डाव; झटापटीत २० चिनी सैनिक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिक्कीम । भारत आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला सीमेवर तीन दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष झाला. गस्त घालणाऱ्या चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय सैन्याने प्रतिकार केला. या झटापटीत भारताचे ४ जवान आणि चीनचे २० सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, सैन्याकडून या वृत्ताबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात परंतु तणावाची असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, कालच (२४ जानेवारी) भारत आणि चीनमध्ये कोअर कमांडर यांच्यात 17 तासांची मॅरेथॉन बैठक झाली होती. सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री अडीच वाजता संपली. चीननेच ही बैठक बोलावली होती. तीन दिवसांपूर्वीच्य सिक्किमच्या के ना कुला पासवर झालेल्या झटापटीनंतर हा तणाव कमी करण्यासाठी काल भारत-चीन दरम्यान सुमारे १५ तास बैठक सुरु होती.

लडाखच्या मोल्डोमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये दोन महिन्यांनंतर अचानक ९ व्या फेरीतील बैठक झाली. या बैठकीतील निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. मात्र, एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठीच ही बैठक झाल्याचे समजते. भारतीय लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. आज तक, टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पुन्हा भारतीय क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न झाल्याने एलएसीवर तणाव वाढला आहे. एकीकडे चीनने लडाखमधून 10000 सैनिकांना हटविल्याचे वृत्त पसरविले आणि दुसरीकडे सिक्किममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारच्या सुत्रांनुसार चीनने तैनाती कमी केली आहे. मात्र, तरीही भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment