Indian Costal Guard Bharti 2024 | इंडियन कोस्टल गार्डमध्ये नोकरीची संधी; दरमहा मिळणार एवढा पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Costal Guard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय तटरक्षक दलाअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या इंडियन कोस्टल गार्ड अंतर्गत खलाशी आणि मेकॅनिकल या 2 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज निघालेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. 3 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यापूर्वीच सर्व उमेदवारांनी अर्ज करावे आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

रिक्त पदांची संख्या | Indian Costal Gurd Bharti 2024

या भरती अंतर्गत एकूण 320 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये खलाशी 260 पदे आणि यांत्रिकी 60 पदांचा समावेश असणार आहे

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून गणित आणि भौतिक शास्त्र विषयासह इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 22 वर्ष असणे गरजेचे आहे.

पगार

खलाशी – 21 हजार 700 रुपये
मेकॅनिकल – 29 हजार 200 रुपये

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यावर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर संपूर्ण अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज भरल्यानंतर सगळी कागदपत्रे जोडायची आहेत.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा