२०२१ मध्ये टीम इंडिया ‘या’ संघांशी भिडणार; जाणून घ्या भारतीय क्रिकेट संघाचा वर्षभराचा कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना व्हायरसमुळे २०२० वर्ष क्रिकेट विश्वासाठी खडतर ठरले. अनेक सामने रद्द झाले मात्र वर्षाच्या शेवटी क्रिकेटला पुन्हा रुळावर आणण्यासाठी खबरदारी घेत प्रेक्षकांविना सामने खेळवले गेले. पण या वर्षी मात्र चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाला गेल्या काही मोजके सामने खेळला आले. या वर्षी बीसीसीआयने चाहत्यांसाठी भरगच्च असा कार्यक्रम ठेवला आहे. आता २०२१ साली भारतीय संघ कोणत्या देशांविरुद्ध कधी आणि कुठे सामने खेळणार आहे याचा कार्यक्रम आता निश्चित झाला आहे. सध्या भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.४ सामन्यांच्या मालिकेतील २ सामने झाले असून उर्वरीत दोन लढती अद्याप बाकी आहेत. तिसरी लढत ७ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान सिडनीत होणार आहे. त्यानंतर चौथी आणि अखेरची कसोटी १५ ते १९ जानेवारी दरम्यान ब्रिसबेन येथे होईल. (Indian Cricket Team 2021 Schedule)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात आल्यावर भारतीय संघा इंग्लंडविरुद्ध मोठी मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून या दोन्ही संघात प्रथम ४सामन्यांची कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पुन्हा आयपीएलचा धमाका अनुभवता येणार आहे. एप्रिल ते मे या काळात आयपीएलच्या १४व्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे.

आयपीएल झाल्यानंतर जून-जुलैमध्ये भारतचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी-२० मालिका होईल. त्यानंतर आशिया कपचे आयोजन केले जाणार आहे. कोरना व्हायरसमुळे ही मालिका गेल्या वर्षी स्थगित केली होती. आशिया कप झाल्यानंतर भारत झिम्बब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ३ वनडे मालिका खेळवली जाईल.ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका होईल. भारतीय संघासाठीचा हा एक आव्हानात्मक दौरा असेल. भारत ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात इंग्लड दौऱ्यावर असेल. इंग्लंड दौऱ्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यानंतर भारतात ऑक्टोबरमध्ये वर्ल्डकपचे आयोजन केले जाइल. वर्षाच्या अखेरीस न्यूझीलंडचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्या दोन कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका होईल.

भारतीय संघाचा २०२१ मधील कार्यक्रम

१) जानेवारी- विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

२) फेब्रुवारी ते मार्च- इंग्लंडचा भारत दौरा

३) एप्रिल ते मे- आयपीएल २०२१

४) जून आणि जुलै- भारताचा श्रीलंका दौरा आणि आशिया कप

५) जुलै- भारताचा झिम्बाब्वे दौरा

६) ऑगस्ट ते सप्टेंबर- भारताचा इंग्लंड दौरा

७) ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

८) आयसीसी टी-२० वर्ल्ड कप, भारत यजमान

९) नोव्हेंबर ते डिसेंबर- न्यूझीलंडचा भारत दौरा

१०) डिसेंबर- भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment