जुलै-ऑगस्टमध्येही क्रिकेट बंदच! टीम इंडियाचे ‘हे’ आगामी २ दौरे रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना संसर्गाचा धोका पाहता टीम इंडिया श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचे आज (शुक्रवारी) BCCIने जाहीर केले. भारतीय क्रिकेट टीम २४ जून जूनपासून श्रीलंका दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी २० मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे दोन्ही दौरे लांबणीवर टाकण्यात येतील अशी शक्यता आधी व्यक्त करण्यात येत होती. पण आता BCCI ने हे दोनही दौरे थेट रद्द केले आहेत. BCCI च्या निर्णयामुळे जुलै-ऑगस्टमध्येही क्रिकेट बंद राहणार असल्यानं क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान, BCCI ने १७ मे रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, मैदानातील परिस्थिती क्रिकेटसाठी अनुकूल आणि सुरक्षित झाल्यानंतरच वार्षिक कराराअंतर्गत बांधिल असलेल्या खेळाडूंसाठी BCCI क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करेल. BCCI आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी कटिबद्ध आहे, परंतु केंद्र व राज्य सरकार तसेच इतर संबंधित संस्थांनी करोन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना धोकादायक ठरणार्‍या कोणताही निर्णय BCCI घेणार नाही, असे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment