भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अनेक दिग्गज खेळाडूंना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या 7 खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

6 फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील. त्यापूर्वीच भारतीय संघातील तब्बल 7 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आता मालिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीसीसीआयने सांगितले की, प्रत्येक सदस्याला अहमदाबादचा प्रवास सुरू करण्यापूर्वी घरी आरटी-पीसीआर चाचणी घेण्यास सांगण्यात होते. तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 31 जानेवारी रोजी धवन आणि नवदीप सैनी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर 1 फेब्रुवारीला रुतुराज गायकवाडचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, एक दिवस आधी झालेल्या चाचणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 2 फेब्रुवारी ला श्रेयस अय्यरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

Leave a Comment