ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर ; आयपीएल मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ‘या’ युवा खेळाडूंना मिळाली संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल संपताच टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे, टेस्ट आणि टी 20 मालिका खेळणार आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. नव्या चेहऱ्यांना टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. या युवा खेळाडूंमध्ये शुभमन गिल, वरुण चक्रवर्थी आणि नवदीप सैनी खेळाडूंना संधी मिळाली आहे. उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याला आराम देण्यात आला आहे.

शुभमन गिल-

फलंदाज शुभमन गिल आयपीएलच्या 13 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतोय. गिलने यंदाच्या मोसमात 12 सामन्यात 378 धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर शुभमनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कसोटी आणि वनडे संघात स्थान दिले आहे.

वरूण चक्रवर्थी-

वरुण चक्रवर्थी या लेग स्पीनरने या मोसमात कोलकाताकडून 11 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. वरुणने नुकतेच आपल्या फिरकीच्या जाळ्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना अडकवले होते. त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात 20 धावा देत 5 विकेट्स झटकल्या होत्या. वरुण चक्रवर्थीला टीम इंडियाकडून टी 20 टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.

नवदीप सैनी-

नवदीप यंदाच्या आयपीएलच्या मोसमात बंगळुरुकडून खेळतोय. सैनी वेगवान गोलंदाज आहे. 11 सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या आहेत. विकेट्स कमी घेतले असले तरी सैनी फलंदाजांना आपल्या बोलिंगवर मोठे फटके मारु देत नाहीये. सैनीला टी 20, वनडे आणि कसोटी संघात स्थान मिळाले आहे.

मुंबईकर सुर्यकुमारच्या पदरी निराशा-

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव आयपीएलच्या या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र सूर्यकुमारच्या पदरी निराशा पडली आहे.

रोहित शर्मा दुखापतग्रस्त-

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. यामुळे रोहित मागील 2 सामन्यात खेळला नाही. त्यामुळे रोहितऐवजी कायरन पोलार्डने मुंबईचे नेतृत्व केलं. मात्र आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही रोहितची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले जात आहे.

टीम इंडिया एकदिवसीय संघ-

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार, विकेटकिपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

टीम इंडिया टी -२० संघ : 

विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयंक अग्रवाल, केएल राहुल  (उपकर्णधार, विकेटकिपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती

टीम इंडिया कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर, अजिंक्य  रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, साहा (विकेटकिपर), वृषभ पंत (विकेटकिपर), बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment