Rahul Sharma : भारत-पाक लढतीआधी भारताला मोठा धक्का !!! ‘या’ धडाकेबाज खेळाडूने निवृत्ती केली जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Rahul Sharma : काही वेळानंतर भारत पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील हायहोल्टेज सामना होणार आहे. या सामन्यात कोणाचा विजय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीसाठीदेखील आजचा सामना खास ठरणार आहे, कारण तो आज आपला 100 वा T- 20 सामना खेळणार आहे. दरम्यान, एकीकडे भारत-पाक सामन्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असताना भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज राहुल शर्मा (Rahul Sharma) याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.

राहुल शर्माने (Rahul Sharma) आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळून दिमाखदार कामगिरी केलेली आहे. आयपीएलसोबतच त्याने भारतीय क्रिकेट संघाचेदेखील प्रतिनिधित्व केलेले आहे. त्याने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तसेच दोन T- 20 सामन्यात भारतीय संघासाठी गोलंदाजी केली. मात्र करिअरला निश्चित दिशा मिळालेली असताना त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचे आरोप करण्यात आले. त्यामुळे त्याची कारकीर्द बहरत असताना त्याला भारतीय क्रिकेट संघातील आपले स्थान गमवावे लागले.

Rahul Sharma announces retirement, set to take part in Road Safety World Series | Cricket - Hindustan Times

राहुल शर्माची कारकीर्द

राहुल शर्माने (Rahul Sharma) आयपीएल क्रिकेटमध्ये 2010 साली पदार्पण केले. या हंगामात त्याने डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर 2011 च्या हंगामात तो पुणे वॉरिअर्स संघाकडून खेळला. त्या हंगामात त्याने (Rahul Sharma) एकूण 16 विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले. 2014 सालच्या आयपीएल हंगामात तो (Rahul Sharma) दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला. त्यानंतर 2015 साली त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने खरेदी केले होते. राहुल शर्माने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तसेच दोन T- 20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

हे पण वाचा :

Stock Market : Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

Infosys : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गेल्या काही वर्षांत मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल ‘इतके’ मायलेज

सध्याच्या काळात Bank FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का??? तज्ञ काय सांगतेय ते पहा

Multibagger Stocks : ‘या’ 5 कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना पुढील महिन्यात मिळणार बोनस शेअर्स !!!