हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्ट मध्ये पास ; लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी संघाबाहेर होता. पंरतु आता भारतीय संघासाठी आणि रोहितच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. हिटमॅन रोहित शर्माने दुखापतीवर मात केली असून आज तो फिटनेस टेस्ट मध्येही पास झाला आहे. एएनआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ही टेस्ट (NCA) राष्ट्रीय क्रिकेट एकॅडमीमध्ये घेण्यात आली. या टेस्टदरम्यान एनसीएप्रमुख राहुल द्रविड उपस्थित होता.

दुखापतीमुळे हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत स्थान मिळाले नव्हते.  मात्र आता रोहितने फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुखापतीमुळे हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत स्थान मिळाले नव्हते.  मात्र आता रोहितने फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रोहित फिटनेस टेस्ट पास  झाल्याने रोहितला त्वरित ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची शक्यता आहे. रोहितला 12 डिसेंबरला म्हणजेच उद्या ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येऊ शकते. मात्र याबाबत अजूनही कोणतीच माहिती देण्यात आली नाहीये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’