मोदींच्या पत्रानंतर रैना झाला भावुक ; ट्विट करून मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा आक्रमक डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही मिनिटांतच रैनाने निवृत्तीची घोषणा केली. रैनाने सोशल मीडियावर निवृत्ती जाहीर केल्यानंतर थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्राच्या माध्यमातून रैनाच्या कारकिर्दीच कौतुक करत त्याचे अभिनंदन केले.

धोनीप्रमाणेच रैनानेही पंतप्रधान मोदी यांच्याकडून आलेल्या पत्राचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. या पत्राबद्दल आभार मानताना रैनाने भावनिक ट्विटदेखील केले. “आम्ही आमच्या देशासाठी खेळताना आमचं सर्वस्व पणाला लावतो आणि घाम गाळतो. देशातील नागरिकांकडून आणि चाहत्यांकडून मिळणारं प्रेम हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान असतं. त्यातच देशाच्या पंतप्रधानांनी आमची पाठ कौतुकाने थोपटणं हा तर सर्वोच्च सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी मी माझं मन भरले. जय हिंद!”, अशा शब्दात रैनाने पत्राबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकाच दिवशी निवृत्ती स्वीकारणाऱ्या धोनी आणि रैनाबद्दल आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या. पत्रात मोदी यांनी या दोन खेळाडूंच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’