टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हाॅकी संघाचे स्वप्न भंगले, बेल्जियमचा 5-2 ने विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनलमध्ये भारताची गाठ पडलीय बेल्जियमसोबत लढत झाली. तब्बल चार दशकानंतर भारताने सेमी फायलन गाठल्याने, त्यामुळे भारत मॅच जिंकून पदक पक्कं करणार का?, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले होते. अखेर या अटीतटीच्या झालेल्या लढाईत भारताचे ऑलिम्पिकमध्ये स्वप्न भंगले. या सामन्यात बेल्जियमने 5-2 असा मोठा विजय मिळविला. मात्र अद्याप कास्यंपदकासाठी भारत जिंकणार का आता याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहणार आहे.

मॅचच्या सुरुवातीला बेल्जियमने पेनल्टी कॉर्नर घेतला. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जियमच्या लुपर्टने गोल करुन बेल्जियम संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली गेलेला होता. मात्र बेल्जिमय विरोधात मॅचमध्ये भारताला 7 व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. यावेळी हरमनप्रीतने शानदार ड्रॅग फ्लिक करुन गोल केला आणि त्याचबरोबर भारताचं गोलच खातंही उघडलं. यामुळे भारत- बेल्जियम 1-1 असा बरोबरीत सामना आला होता.

मॅचच्या 8 व्या मिनिटाला मनदीप सिंगने रिव्हर्स स्लॅप शॉटसह गोल करत भारतासाठी दुसरा गोल केला. त्यामुळे भारताने आघाडी घेतली होती. भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमला ​​दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारताने गोल करण्याची संधी दिली नाही. मात्र, 18 व्या मिनिटाला सापडलेल्या कॉर्नरने बेल्जियमच्या संघाला बरोबरीची संधी दिली. अलेक्झांड्रे हेंड्रिक्सने स्पर्धेचा 12 वा गोल केला. बेल्जिमयमच्या हेंड्रिक्सने 49 व्या मिनिटाला तिसरा गोल करत 3-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर 54 मिनिटाला पेनल्टी काॅर्नरवरून बेल्जियमच्या खेळाडून गोल करत 4-2 अशी आघाडी विजयी घाैडदाैड केली होती. शेवटची 6 सेंकद बाकी असताना बेल्जियमने 5 वा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला.