हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रामध्ये सोमवारी मकरसंक्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सणानिम्मित लहान मुलांनी पतंग उडवत सणाचा आनंद लुटला. मात्र काल हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटनाही घडली. याठिकाणी पतंगीचा चिनी मांजा गळ्याला कापल्याने एका 30 वर्षीय भारतीय जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या जवानाला त्वरित रूग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
एका बाजूला मकर संक्रांतीच्या सर्वजण आनंद लुटत असताना दुसरीकडे हैदराबादमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वांनाच खळबळून सोडले. हैदराबादमधील नाईक कागीथला कोटेश्वर रेड्डी हे शनिवारी संध्याकाळी लँगर हाऊस येथील इंदिरा रेड्डी उड्डाणपुलावर दुचाकीवर जातो. याचवेळी त्यांच्यामध्ये चीनी मांजा आडवा आला. हा मांजा थेट त्यांच्या गळ्याला जाऊन कापला. यामुळे ते गंभीर जखमी झाले. पुढे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात देखील घेऊन जाण्यात आले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. शेवटी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रेड्डी यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
समोर आलेल्या माहितीनुसार, कोटेश्वर रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील पेड्डा वालटेरूचे रहिवासी होते. आता या घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 304 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशी राज्यामध्ये अनेक विविध ठिकाणी मांजामुळे मानवांना आणि पक्षांना हानी पोहचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे चीनी मांजा विक्रीसंदर्भात सरकारने कठोर पावले उचलावी अशी मागणी करण्यात येत आहे.